कागदी बॉंडची झंझट संपली! महाराष्ट्रात आजपासून e-Bond सुरू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई , दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांना आता कागदी बॉंडच्या झंझटीतून मुक्तता मिळाली आहे. महसूल विभागात आजपासून Electronic Bond (e-Bond) प्रणाली सुरू झाली आहे. हा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला.
बदलत्या काळानुसार प्रशासनात डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना कागदी बॉंडसाठी कार्यालयीन फेऱ्या, काळाबाजार व गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही. e-Bond प्रक्रिया जलद, पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने होणार आहे.
राज्यातील महसूल विभागात सुरू असलेल्या सुधारणा व आधुनिकरणाच्या उपक्रमांत हा निर्णय मोठा टप्पा मानला जात आहे.
नागरिकांना थेट ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि पैसा वाचणार आहे.