शेतकऱ्यांची काळी दिवाळी; महायुती सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध आंदोलन
लातूर, दि. १६ (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत न मिळाल्याने त्यांच्या दिवाळीवर संकट ओढवलं आहे. बळीराजाच्या या दुःखाकडे महायुती सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाच्या वतीने उद्या, शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन “काळी दिवाळी” साजरी करून मौन धारण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि शेतकरी बांधवांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.