शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार
भारतीय जनता पार्टी जिल्हा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष मा. बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
लातूर, दि. ८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या निर्णयाचे लातूर जिल्ह्यासह सर्व शेतकरी बांधवांतर्फे स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष मा. बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, वादळ, गारपीट, पूर यांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांची हतबल अवस्था पाहता शासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करून मदतवाटपाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, लातूर जिल्ह्यातील तात्पुरत्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४० हजार रुपये, तर सरासरी तीन लाखांपर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अडचणीत सापडलेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे. बँकेचे कर्ज वसुली थांबविण्याचे निर्देश देण्यात आले असून पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना १७ हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. पूर, गारपीट, पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शासनाकडून घरकुल बांधकामासाठी विशेष अनुदान देण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आपत्तिग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे.
राज्य सरकारने हा निर्णय घेताना ओला दुष्काळ घोषित करून मदतीचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे लातूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्हा कृषी संघटना, शेतकरी संघटना आणि स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले असून, "या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा किरण उमटला आहे," अशी भावना व्यक्त केली आहे, असेही मा. पाटील यांनी शेवटी सांगितले.
भारतीय जनता पार्टी जिल्हा लातूर (ग्रामीण)ची कार्यकारणी जाहीर झाली ती खालील प्रमाणे आहे.
बसवराज माधवराव पाटील औसा जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून नवनाथ भोसले लातूर दगडू साळुंखे निलंगा हनुमंत नागटिळक मुरुड भीमाशंकर असते श्री भारत जामी अहमदपूर सौ उषा शंकर रोडगे उदगीर अशोक केंद्रे अहमदपूर, वसंतराव डिगोळे चाकूर किरण उदगीर औसा शेषराव मुमाळे निलंगा. परिस्थितीस म्हणून संजय दुर्वे निलंगा सुभाष जाधव औसा सो मनीषा नवनीत वडवळ नागनाथ अमोल निळवदे उदगीर ज्ञानेश्वर जेवले चिरून अनुपाळ चिटणीस सज्जन लोणारे चाकूर त्रिंबक कुठे अहमदपूर जनार्दन समोजी निलंगा काकासाहेब मोरे औसा दशरथ सरोदे लातूर विजयी निळकंठ पाटील उदगीर सो ममता गुजर काबळे जळकोट सौ ललिता कांबळे लातूर ग्रामीण व सौ.श्यामल शिवशंकर करामुंगे, उदगीर. कोषाध्यक्ष म्हणून बसवराज धाराशिवे औसा, जिल्हा युवा मोर्चा ऋषिकेश रमेश कराड लातूर ग्रामीण अध्यक्ष, जिल्हा महिला मोर्चा उतरा कलबुर्गे उदगीर अध्यक्षा. अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष शहानुर रहेमान बागवान तांदूळजा लातूर ग्रामीण, जिलानी बागवान निलंगा सरचिटणीस., जिल्हा एससी मोर्चा अध्यक्ष रोहिदास वाघमारे चाकूर, दीपक चाबुकस्वार औसा सरचिटणीस जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष गोविंद चिलकुरे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष धर्मपाल देवशेटे जळकोट. जिल्हा वैद्यकीय आघाडी डॉ. मल्लिकाअर्जुन विरपक्षप्पा शंकद स्वामी, औसा. जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष मेघराज श्री किसनजी बाहेती चाकूर.
*विशेष निमंत्रित :-* माजी मंत्री आमदार निलंगा संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार लातूर ग्रामीणचे श्री रमेशआप्पा कराड, आमदार औसा श्री अभिमन्यू पवार, अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग माजी आमदार श्री पाशा पटेल, माजी खासदार श्री सुनील गायकवाड, माजी आमदार लातूर श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार उदगीर गोविंद केंद्रे, प्रदेश पदाधिकारी श्री अरविंद पाटील निलंगेकर, माजी जिल्हाध्यक्ष ग्रामीण श्री दिलीपराव देशमुख, माजी अध्यक्ष जि. प. श्री राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष जि. प. श्री. रामचंद्र तीरूके, लातूर शहर उमेदवार सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर, माझी जि प सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे. आणि उर्वरित कार्यकारिणी नंतर जाहीर करण्यात येणार आहे असेही बसवराज माधवराव पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण यांनी बोलताना व्यक्त केले.