ठाणे येथे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्तांचा मेळावा ९ ऑक्टोबरला

अहिल्यानगर जिल्ह्यातील बैठकीत निर्णय; वैजनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

     ठाणे, दि. ७ (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांची बैठक दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या संघटनेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्यभरातील पुरस्कृत व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्यस्तरीय मेळावा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला समाज भूषण पुरस्कारप्राप्त समन्वयक वैजनाथ वाघमारे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शासन पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या समस्या, शासनमान्यता, तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. समाजातील विविध स्तरांवर कार्य करणाऱ्या पुरस्कृत व्यक्तींना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याचा आणि एकत्रितपणे पुढील वाटचालीचे नियोजन करण्याचा हेतू या मेळाव्यामागे आहे. मेळाव्याचे ठिकाण: शिवसेना कार्यालय, ठाणे (एकनाथ शिंदे गट) दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ रोजी  मुख्य उपस्थित: वैजनाथ वाघमारे (समन्वयक) , असे आवाहन  राज्यातील सर्व शासन पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर