लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि; लातूर बँकेच्या संचालक मंडळाच्या कौतुकास्पद निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा...
*चेक न वटल्यामुळे लागलेले लाखो रुपयांचे चार्जेस ग्राहकांना परत करण्याचा निर्णय...
*बँकेच्या डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करण्याचे केले आवाहन.*
लातूर, दि. १६ (प्रतिनिधी): भारतीय रिजर्व बँकेकडून घेतलेल्या निर्णयामुळे दि. ०४ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात Continuous Clearing पद्धत सुरू करण्यात आली, या सुविधेमुळे चेक एक दिवसात खात्यात जमा होऊ शकणार होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांचे चेक वटण्यास अनेक दिवस लागत आहेत. त्यामुळे याकाळात ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच ग्राहकांना चेक न वटल्यामुळे दंड देखील लागत आहे. यासर्व बाबींचा विचार करून लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेच्या संचालक मंडळाने ग्राहकांच्या हिताचा खूप मोठा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने दि. ४ ऑक्टोबर २०२५ ते २४ ऑक्टोबर २०२५ याकाळातील ग्राहकांना चेक न वटल्यामुळे बँकेकडून लागलेले चार्जेस रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. ग्राहकांचे लाखो रुपये चार्जेस यामुळे परत मिळणार आहेत व या काळात चार्जेस लागणार नाहीत. हजारो ग्राहकांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर ही मराठवाड्यातील संपूर्ण डिजिटल बँकिंग सुविधा देणारी बँक म्हणून नामांकित आहे. बँकेकडे मोबाईल बँकिंग, एटीएम, यूपीआय, आयएमपीएस, क्यु आर कोड अशा आधुनिक बँकिंग सुविधा कार्यान्वित आहेत.
बँकेच्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करुन त्रास व अमूल्य वेळ वाचवावा असे आवाहन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी केले आहे.