राजस्थानचे राज्यपाल मा. हरिभाऊ बागडे यांनी किर्ती ग्रुप उद्योजक अशोक विष्णुदास भुतडा यांच्या निवासस्थानी भेट
लातूर, दि. २६ : ‘संत भेटती आजी मजा!’ — राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा लातूर दौरा प्रेरणादायी ठरला.
दीपावलीच्या पावन सणानिमित्त लातूरमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले, कारण राजस्थानचे राज्यपाल मा. हरिभाऊ बागडे नाना यांनी शनिवारी लातूर येथे किर्ती ग्रुप उद्योग संस्थेच्या प्रमुख उद्योजक अशोक विष्णुदास भुतडा यांना त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी संत व्यक्तिमत्वांची भेट मिळणे म्हणजे खरोखरच दैवयोग असल्याचे सांगितले.
मा. राज्यपाल म्हणाले की, "संतांच्या सहवासाने आपल्यात चतुर्भुजत्व येते, त्यांच्या कृपेने आपण परमपदाला पोहोचतो." दीपावलीसारख्या शुभ प्रसंगी अशा संतसदृश उद्योजकांना भेटण्याचा योग लाभल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
किर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भुतडा यांनी राज्यपालांचे हार्दिक स्वागत केले. गेल्या तेरा वर्षांपासून कर भरण्यात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या या उद्योगसमूहाच्या कार्याची राज्यपालांनी प्रशंसा केली. त्यांनी राधा-कृष्ण मूर्तीसमोर राज्यपालांचे स्वागत करून त्यांना शाल, फेटा आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
राज्यपाल बागडे म्हणाले, "शिक्षण हेच गरीबी दूर करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. उद्योग व व्यवसाय शिक्षणाच्या आधारावर उभे राहिले तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. तुम्ही घेतलेला शिक्षणप्रधान व उद्योगशील मार्ग सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."
या प्रसंगी नैसर्गिक शुगरचे श्री. बी. बी. ठोंबरे, डाळ मिल असोसिएशन लातूरचे अध्यक्ष श्री. हुकूमचंदजी बन्सीलालजी कंतंत्री, उद्योजक विवेकजी देशपांडे, छत्रपती संभाजी नगरचे श्री. प्रवीण सर देशमुख, सुधीरजी धुकेकर, हेमंतजी वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या समारंभात सतीश, अशोक, कीर्ती, भारत, सीए आनंद, सीए अर्जुन, अजित, अंकिता, सीए अरविंद, आदित्य भुतडा आणि संपूर्ण भुतडा कुटुंबीय उपस्थित होते. घरातील सर्व भगिनी, मुले आणि मान्यवरांनी उपस्थित राहून दीपावलीच्या शुभ वातावरणात या भेटीला आनंददायी रंग दिला.
राज्यपालांच्या या भेटीमुळे लातूरमधील उद्योग, शिक्षण आणि सामाजिक कार्यक्षेत्रात प्रेरणेचा नवीन संचार झाला असून, ‘संत भेटती आजी मजा!’ या अभंगातील भावार्थाचा प्रत्यय सर्वांना आला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.