लातूर येथे राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद
मुंबई, पुणे, कोल्हापूरचे वर्चस्व
लातूर, दि. १७ (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला प्रारंभ झाला.
पहिल्या दिवशी विविध गटातील जलतरण स्पर्धांमध्ये मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत वर्चस्व राखले.
१४ व १७ वर्षांखालील मुलं-मुलींच्या गटांमध्ये झालेल्या २०० मी. फ्री स्टाईल आणि इतर स्पर्धांमध्ये अमेय देवधर (मुंबई), सलीनी माळुंगे (पुणे), काजोल बागुल (कोल्हापूर), अमर जल्लाद (पुणे), श्रावस्त मुके (मुंबई), व भक्ति कर्णिक (नागपूर) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेला राज्यभरातून जलतरणपटूंचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून प्रेक्षकांचीही चांगली गर्दी दिसून येत आहे.