पुणे पोलीस आयुक्तालयासमोर बहुउद्देशीय कामगार संघटनेचे आमरण उपोषण यशस्वी
पुणे, दि. ०३ (प्रतिनिधी) : न“मला लढा मान्य आहे, रडगाणे मान्य नाही” या घोषणांसह बहुउद्देशीय कामगार संघटना महिला आघाडीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तालयासमोर सुरू झालेले आमरण लक्षणीय उपोषण यशस्वी झाले.
कामगार नेते व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नामदेवराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये महासचिव सौ. जयश्रीताई दनाने, उपाध्यक्ष सौ. मालनताई लोंढे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सौ. वर्षाताई मोरे, उपाध्यक्ष पुणे सौ. सुवर्णाताई चव्हाण व सौ. मीनाताई चव्हाण यांचा विशेष सहभाग होता.
या आंदोलनात सरचिटणीस श्री. लक्ष्मण ननावरे, पुणे जिल्हा सरचिटणीस श्री. सत्यवान गायकवाड, समन्वयक श्री. सागर घोरपडे, संपर्कप्रमुख श्री. अमोल शिंदे, उपाध्यक्ष श्री. विनोद गायकवाड, श्री. स्टीवन वानखेडे, सदस्य श्री. संदीप गायके, उपाध्यक्ष सौ. मधुमती गालफाडे, सौ. सुनिता उघडे, संघटक सौ. सिंधूबाई टिखे, सौ. पवित्रा यादव, सहसंघटक सौ. सीताबाई गव्हाणे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपोषणाचे मुख्य कारण म्हणजे पेंटर कामगार मोहिते यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा ही होती. पीडित मोहिते परिवार – पत्नी, मुलगी, मुलगा यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच घटनेचा सखोल तपास पुन्हा व्हावा, अशी ठाम मागणी केली.
या आंदोलनादरम्यान पुणे पोलीस उपायुक्त मा. संदीप भाजीभाकरे यांनी मोहिते परिवाराशी संवाद साधला. त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात आले. याबद्दल संघटनेतर्फे आणि मोहिते परिवारातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पी.आय. मा. पांढरे यांनीही पीडित परिवारासोबत सविस्तर चर्चा करून योग्य मार्गदर्शन दिले. याशिवाय पोलीस स्टेशनचे मा. बांगर साहेब, अन्य पोलीस अधिकारी तसेच LIB व एस.बी. जाधव यांनी तत्काळ सहकार्य केले.
संघटनेच्या घोषणेनुसार,
“कायदा भीमाचा – दांडपट्टा लहुजीचा,
लढेगें और जितेगें – जय लहुजी ! जय भीम !!”
अशा बुलंद हाकांसह हे आंदोलन संपन्न झाले.
बहुउद्देशीय कामगार संघटना महिला आघाडी व सर्व पदाधिकारी, लहुसैनिक यांनी एकत्रितपणे दिलेला संघर्ष न्यायासाठी पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.