धाराशिव येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा — तरुणांसाठी सुवर्णसंधी!


      धाराशिव, दि. २५ (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या मंगळवारी, दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी, पुष्पक मंगल कार्यालय, धाराशिव येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्याचे आयोजन धाराशिवचे आमदार तथा (MITRA)चे उपाध्यक्ष राणा जगजितसिंग पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले असून, या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपन्यांचा सहभाग अपेक्षित आहे. विविध क्षेत्रांतील उद्योगसमूह आणि संस्थांकडून शेकडो रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून, स्थानिक तरुणांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

यासोबतच, स्वयंरोजगार शिबिर आयोजित करण्यात आले असून, व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना मार्गदर्शन, योजना माहिती तसेच बँकिंग सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

आ. राणा जगजितसिंग पाटील यांनी सांगितले की, “या मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने मोठी संधी मिळणार आहे. अधिकाधिक इच्छुकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे:
🔗 https://shantanupayal.jobfairindia.in

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9076200551 / 52 / 53

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर