श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२५-२६ साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न
मुरूम, दि. ४ (प्रतिनिधी): श्री विठ्ठलसाई कारखान्याचे कामकाज नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून चालू हंगामासाठी आवश्यक असलेली संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून जवळपास १४,००० हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने ५ लाख म. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी पुरेशी ऊसतोड व वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम पुढील आठवड्यात होणार आहे.
या हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देण्यात येणार असून कोणाचाही ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही.
या सोहळ्याप्रसंगी मा. श्री. बापुराव पाटील, चेअरमन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., धाराशिव, कारखान्याचे व्हा. चेअरमन , मा. श्री. सादीकसाहेब काझी, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. शरण पाटील तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री शरणप्पा पत्रिके, ऍड. सुभाषराव राजोळे, अनिल सगर, रहेमान जमादार, गोविंदराव पाटील, भालचंद्र लोखंडे, शरणप्पा कबाडे, सचिन पाटील, केशवराव पवार, माणिकराव राठोड, विठ्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, ऍड. संजय बिराजदार, ऍड. विरसंगप्पा आळगे तसेच मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य राम सोलंकर, प्राचार्य अशोक सपाटे, रशिद शेख, प्रा. शौकत पटेल, नाना सूर्यवंशी, योगेश राठोड, रफिक तांबोळी, मनोहर सास्तुरे, प्रल्हाद काळे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, शरण पाटील व्होर्टीकर, हेमंत पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. एस. आर. गवसाणे व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.