साहित्यप्रेमी राजकारणीच देशपातळीवर मोठे होतात : राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी



लातूरात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न 

 लातूर :-राजकारणातील लोकांनीसुद्धा साहित्याची संगत ठेवली पाहिजे. जे राजकारणी साहित्याच्या संगतीत राहिले, ती माणसे राज्याच्या व देशाच्या पटलावर मोठी झाली आहेत. साहित्यामुळे माणूस प्रगल्भहोतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी केले.
साहित्य सारथी कला मंचच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात एक दिवशीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले, यावेळी ते बोलत होते. हे साहित्य संमेलन गझल मुशायरा, कविसंमेलन, बालनाट्य सादरीकरण व साहित्य सारथी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ अशा चार सत्रात झाले, यावेळी ते बोलत होते. गझल मुशायराच्या अध्यक्षस्थानी पोनि दयानंद पाटील होते. उद्घाटन अँड गणेश गोमचाळे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ गझलकार योगीराज माने, प्रा. डॉ. पल्लवी पाटील, गझलकार विमल मुदाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अजहर शेख व श्याम माने यांनी केले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी भारत सातपुते होते. यावेळी नरसिंग इंगळे, दयानंद बिराजदार, प्रा. डॉ. नयन राजमाने उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद श्रीमंगले व समिंदर शिंदे यांनी केले. यात राज्यभरातून सुमारे ६५ कवींनी सहभाग नोंदवला. साहित्य सारथी राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाच्या अध्यक्षस्थानी दै. नवराष्ट्रचे लातूर, बीड, धाराशिवचे आवृत्तीचे जयप्रकाश दगडे होते. उद्घाटक शिवसेना (उबाठा) चे लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषद लातूरचे उपाध्यक्ष विवेक सौताडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा दीपाली औटे उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष कवी सुरेश धोत्रे यांनी केले तर आभार साहित्य सारथी मंचाचे अध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी मानले. सूत्रसंचालन गणेश परळे यांनी केले. कार्यक्रमोसाठी अध्यक्ष गंगाधर डिगोळे, उपाध्यक्ष शार्दूल बौडीवाले, कार्याध्यक्ष गणेश परळे, संजय राजुळे, राघवेंद्र देबडवार, प्रमोद टेकले, संतोष सोनवणे, अमित भालके आदींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर