उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दौरा कार्यक्रम


      लातूर, दि. २९ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
       नांदेड येथून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे सायंकाळी ७ वाजता उदगीर येथे आगमन होईल. याठिकाणी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण व अभिवादन होईल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता उदगीर येथील दसरा मैदान, तालुका क्रिडा संकुल (जिल्हा परिषद मैदान) येथे त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होईल. रात्री ९ वाजता उदगीर येथील उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल येथे नेत्र रुग्ण धर्मशाळा व दंत चिकित्सा रूग्णालय लोकार्पण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. रात्री ९.१५ वाजता नांदेड रोडवरील लोणी येथील उदयगिरी औद्योगिक वसाहत येथे आगमन होईल व राखीव. रात्री १० वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर