मतदार नोंदणी करण्याचे विभागीय आयुक्त यांचे आवाहन

पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम-२०२५

         छत्रपती संभाजीनगर, दि. ०१, (विमाका) :- दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणे बाबतचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यानुसार पदवीधर संघाच्या यापूर्वीच्या याद्या रद्द झालेल्या असून नव्याने पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्यात येत आहे.

पदवीधर मतदार नोंदणी दिनांक ३०.०९.२०२५ ते ०६.११.२०२५ या कालावधीमध्ये विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये येथे फॉर्म उपलब्ध होतील तसेच भरलेले फॉर्म दाखल करता येतील.

आपल्या कार्यालयातील तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, संस्था, बँक, औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी,कर्मचारी यांच्यापैकी जे पदवीधर मतदार नोंदणीस पात्र असतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आपलेस्तरावरुन मतदार नोंदणीची सूचना अवलोकनास आणून देण्यात यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर