कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सलग तेरा वर्षे सर्वोच्च मार्केट टॅक्स भरण्याबद्दल सन्मान

    लातूर, दि. २५: लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित अल्पोपहार सह सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सर्वाधिक मार्केट टॅक्स भरण्यात सलग तेरा वर्षे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक अशोक भुतडा यांचा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमितभैया देशमुख यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती बावणे साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती ग्रुपच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे व शेतकरी हितासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी असेही नमूद केले की, "स्थानिक उद्योगांनी प्रामाणिकपणे कर भरणे आणि व्यापारात पारदर्शकता ठेवणे हेच आर्थिक विकासाचे खरे बळ आहे."

या प्रसंगी बाजार समितीच्या वतीने कीर्ती ग्रुपला ‘सर्वाधिक मार्केट टॅक्स भरणारा व्यापारी पुरस्कार – प्रथम क्रमांक’ या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने मागील तेरा वर्षांपासून नियमित कर भरण्याची परंपरा कायम ठेवत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. उद्योग समूहाचे संचालक अशोक भुतडा यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा पुरस्कार आमच्या प्रामाणिक कामगिरीचे आणि समाजाविषयी असलेल्या जबाबदारीच्या भावनेचे प्रतीक आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन बाजार समिती, लातूर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. दिवाळीच्या या उत्सवी वातावरणात सन्मान सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर