लातूर जिल्ह्यातील धडाकेबाज वृक्षतोड; वनविभागाचा डोळा झाक?

   

 🌳 लातूर, दि. १५ (प्रतिनिधी)  : लातूर शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दररोज तब्बल ८ ते १० ट्रॅक्टरद्वारे कापलेली झाडे शहरातील बाजारपेठांमध्ये openly विक्रीसाठी आणली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

या अनियंत्रित वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासन पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीसाठी मोहिमा राबवत असताना, दुसरीकडे लातूर शहरात उघडपणे चालणारी ही बेकायदेशीर वृक्षतोड चिंताजनक ठरत आहे.

नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे? दररोज ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणावर लाकूड बाजारात येते, तरी कोणतीही कारवाई होत नाही, हे समजण्यासारखे नाही, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

स्थानिक पर्यावरणप्रेमी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वनविभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, नागरिकांचे म्हणणे आहे की, या वृक्षतोडीमागे काही प्रभावशाली घटकांचे छत्रछाया असल्याने संबंधित अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे “कायदा सर्वांसाठी समान आहे का?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संघटनांनी लातूर जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून, योग्य वेळी मोठे आंदोलन उभारले जाईल, अशी चेतावणी दिली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर