समाजभूषण पुरस्कार विजेते शेषेराव करखेलीकर यांचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांना निवेदन


     नागपूर, दि. २ (प्रतिनिधी) :डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री. शेषेराव करखेलीकर यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा सत्कार केला. त्यामुळे बोलताना म्हणाले की, आपल्या विविध मागण्यांसंदर्भात नागपूर येथे प्रा. जोगेंद्र कवाडे सरांची भेट घेतली. यावेळी करखेलीकर यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मानधन आणि प्रवास सुविधा देण्याबाबत निवेदन सादर केले.

या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनाने समाजभूषण पुरस्कार विजेत्या व्यक्तींना दरमहिना पंधरा हजार रुपये मानधन द्यावे. तसेच अशा पुरस्कार विजेत्या व्यक्तींना सर्वच एसटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. समाजासाठी कार्य करणाऱ्या आणि मानाचा सन्मान मिळवलेल्या व्यक्तींना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

      प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी करखेलीकर यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. "या मागण्या रास्त असून समाजाच्या हितासाठी आहेत. मी वैयक्तिकरित्या हे प्रकरण शासनदरबारी मांडून शंभर टक्के न्याय मिळवून देतो, याची खात्री बाळगा," असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

श्री. करखेलीकर यांच्या या पुढाकाराचे उपस्थितांनी स्वागत केले असून पुरस्कार विजेत्यांच्या न्याय्य मागण्यांना शासन लवकरात लवकर मान्यता देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर