अहिल्यानगर येथे राज्यातील पुरस्कारार्थींचा भव्य मेळावा २६ ऑक्टोबरला
अहिल्यानगर, दि. १९ ऑक्टोबर — राज्यातील सर्व शासन पुरस्कार प्राप्त व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, पुरस्कारार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघावा यासाठी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी ११.३० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड, स्वस्तिक चौक, पुणे बस स्थानकाजवळ, अहिल्यानगर येथे होणार आहे.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मा. अँड. वैजनाथ वाघमारे, शिवसेना (शिंदे गट) समन्वयक, महाराष्ट्र राज्य, हे भूषविणार आहेत.
🔸 पार्श्वभूमी
दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे मा. वैजनाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारार्थ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत पुरस्कारार्थ्यांचे मानधन, एस.टी. बस प्रवाससुविधा तसेच शासन स्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय पुरस्कारार्थींचा मेळावा घेऊन सर्वांच्या सह्यांचे निवेदन तयार करून ते शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असा दिलासा दिला आहे.
🔸 मेळाव्याचे उद्दिष्ट
या मेळाव्यात राज्यातील सर्व पुरस्कारार्थींनी एकत्र येऊन आपले प्रश्न, मागण्या आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचवाव्यात हा मुख्य हेतू आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार प्राप्त महासंघ तर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, राज्यातील सर्व पुरस्कारार्थींना “चलो अहिल्यानगर!” या आवाहनाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔸 प्रमुख संपर्क व आयोजक
१) नामदेवराव चांदणे (अहिल्यानगर) – ९२७००४३६९६
२) राजेंद्रजी मोहिते (इचलकरंजी) – ९१५६६८८५६६
३) सुनंदा ताई चांदणे (अकोला) – ७०५७९४५८५२
४) उषाताई नेटके (पुणे) – ९९२१९४६४१४
५) पोपटराव वाघ (सटाणा) – ८०५५६५८७२६
६) चंद्रकांतजी वानखडे (नागपूर) – ९८६०४६८६१८
७) शंकरराव उमापे (सातारा) – ९८८११६०२७८
८) नामदेव मोरे (जळगाव) – ९४२३९४९३८३
९) शेषरराव करखेलीकर (लातूर) – ९४२१४३११०३
१०) सुदाम आवाडे (मुंबई) – ९२२१०२२१७६
११) सिताबाई कसबे (भिवंडी) – ९१९१५५३११६
१२) सुनिल सकट (अहिल्यानगर) – ९९७०५८३२१०
१३) प्रल्हाद तायडे (अमरावती) – ७७९८४७७३०२
१४) राजाभाऊ हातगडे (अमरावती) – ९९७०५६३११९.
राज्यातील सर्व पुरस्कारार्थींनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या मागण्या सशक्तपणे मांडाव्यात, असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला आहे.