लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून "काळी दिवाळी" आंदोलन
लातूर, दि. 17 ऑक्टोबर 2025 – शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संकट ओढवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "काळी दिवाळी" आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रदेश सचिव मदनराव काळे, संतोष शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, रघुवीर पाटील, जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी, पुरुषोत्तम पाटील, तसेच विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ संजय शेटे, जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट, लातूर