"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावेत – शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी"


      लातूर, दि. १६ (प्रतिनिधी): सोयाबीनला 5400 रूपये हमीभाव असताना बाजारात मात्र 3500 ते 4000 रुपये दराने खरेदी केली जात आहे ही शेतकर्‍यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणार्‍यावर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारने त्वरित हमीभावाने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी केली आहे 
लातूर जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरवरील खरीपाची पिके अतिवृष्टी व महापुरामुळे वाहून गेली आहेत. काही शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर काही शेतकर्‍यांच्या विहीरी मातीने बुजून गेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आलेले सोयाबीनचे पिक बाजारामध्ये विक्रीसाठी आले असताना त्या पिकाला 3500 ते 4000 पर्यंत भावाने खरेदी केली जात आहे. शासनाने 5400 रूपये हमीभाव जाहीर करूनही नाफेडकडून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले नसल्यामुळे शेतकर्‍यांना कमी भावामध्ये आपल्या मालाची विक्री करावी लागत आसल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत आहे . त्यामुळे शासनाने अतिवृष्टी व महापुराच्या संकटातून उभारणार्‍या शेतकर्‍यांच्या हितासाठी त्वरित सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर