प्रति,

*मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील साहेब,
सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – 400 032.*

विषय : साप्ताहिक “नंदादीप वार्ता” च्या दिपावली 2025 विशेषांकास जाहिरातीसाठी मा. मुख्यमंत्र्यांना शिफारस पत्र देण्याबाबत.

महोदय,

      सादर विनंती आहे की, “नंदादीप वार्ता” हे साप्ताहिक गेली वीस वर्षे सातत्याने लातूर जिल्ह्यातून प्रकाशित होत असून, ग्रामीण व शहरी भागातील वाचकांमध्ये याचा चांगला प्रभाव आहे. या साप्ताहिकामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती, सहकार, आरोग्य, शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील घडामोडी तसेच लोकजागृतीपर लेखन सातत्याने प्रसिद्ध होत आहे.

साप्ताहिक “नंदादीप वार्ता” आपल्या प्रवासातील दोन दशके पूर्ण करून आता दिपावली – 2025 विशेषांक प्रकाशित करीत आहे. या विशेषांकात विविध मान्यवरांचे लेख, विशेष लेखमालिका तसेच समाजोपयोगी माहिती समाविष्ट केली जाणार असून, या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या विकासदृष्टी व जनकल्याणकारी धोरणांचा आढावा वाचकांपर्यंत पोचविणे हे आहे.

या निमित्ताने, आपल्या वतीने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जाहिरातीसाठी शिफारस पत्र देण्याबाबत विनंती करीत आहेत. या विशेषांकात प्रकाशित करण्याची संधी मिळाली तर अंकाची शोभा निश्चितच वाढेल. तसेच वाचक व समाजामध्ये शासनाविषयी अधिक विश्वास व प्रेरणा निर्माण होईल.

म्हणूनच आपण या संदर्भात मा. मुख्यमंत्री यांना “नंदादीप वार्ता दिपावली – 2025 विशेषांक” साठी शिफारस पत्र देऊन सहकार्य करावे हि, विनंती आहे.


आपला नम्र,

संपादक : नंदादीप वार्ता, लातूर.
मो. नं.  ९४२३७३५४०९

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर