आज बुद्धिवंतांचा मेळावा ; पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचे व्याख्यान

*लातूर शहर जिल्हा भाजपाच्या सेवा पंधरवाडा अंतर्गत*

   लातूर, दि. ०१ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने बुद्धिवंतांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा आज दि. ०१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पार पडणार असून या मेळाव्यात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यास अधिकाधिक संख्येने विचारवंतानी सहभागी व्हावे असे आवाहन लातूर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर यादरम्यान सेवा पंधरवाडा पार पडत आहे. लातूर शहर जिल्हा भाजपच्या वतीने या सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून या अभियानांतर्गतच बुधवार दि. ०१ ऑक्टोबर रोजी बुद्धिवंतांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. लातूर शहरातील औसा रोड येथे असलेल्या छत्रपती चौकातील वाडा हॉटेलच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम राष्ट्र या विषयावर डॉ.तात्याराव लहाने व्याख्यान देणार आहेत. या मेळाव्यासाठी लातूर शहर व परिसरातील बुद्धिवादी व विचारवंताना निमंत्रित करण्यात आलेले आहे. 
या मेळाव्यास अधिकाधिक विचारवंतानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह सेवा पंधरवाडा अभियानाचा संयोजक अमोल गीते, सहसंयोजक संजय गीर, रविशंकर लवटे यांच्यासह बुद्धीजीवी संमेलनाचे संयोजक प्रा.उदय देशपांडे व सहसंयोजक मनोज सुर्यवंशी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर