बोरगाव येथे 3000 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ
बोरगाव, दि. १६ : जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रमा अंतर्गत बोरगाव येथे सरपंच सौ.कविता गौतम कांबळे आणि उपसरपंच लक्ष्मण राव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कविता कांबळे होत्या.यावेळी उपसरपंच लक्ष्मणराव पाटील, ग्राम पंचायत सदस्य राम कलकुटे, बसंतराव मुळे ,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मधुकरराव सुतार ,कृषी सहाय्यक कांबळे साहेब ,तलाठी दयानंद जोगदंड साहेब , आरोग्य खात्याचे कर्मचारी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.चौधरी सर,हुतात्मा बाबूराव बोरगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .पाटील सर ,अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी सह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत सादर करण्यात आले .त्यानंतर वृक्ष लागवडीची शपथ सर्वांना देण्यात आली ,ग्रामपंचायत अधिकारी संजय नवगिरे यांनी शपथ दिली.त्याचबरोबर परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव श्री.मारुती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन माने सर यांनी केले .यावेळी गावातील सर्व विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला .सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती .अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी तुळजापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.कावळे साहेब (पंचायती विभाग )या ठिकाणी उपस्थित होते . आज जवळपास 3000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ बोरगाव येथे करण्यात आला असून तुळजापूर तालुक्यातील एकूण अठरा गावांमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला यात बोरगाव मध्ये ही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सीसीटीव्हीच्या माध्यमातुन माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आली .धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पूजार यांच्या या महत्वकांक्षी संकल्पनेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद दिसून आलेला आहे .संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली
आहे. प्रत्येक ग्रामपंचायत ला त्यांनी टार्गेट दिले आहे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली असून लोकसहभाग ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.