राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक येथे १५ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा
लातूर : येत्या १५ सप्टेंबरला दू.१२ वा. नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुख्य उपस्थितीत तसेच प्रांताध्यक्ष आ.श्री. शशिकांतजी शिंदे, खा. सौ.सुप्रियाताई सुळे, मा.आ.जयंतराव पाटील, मा.अनिलबाबू देशमुख, मा.आ. जितेंद्र आव्हाड, मा.आ.रोहितदादा पवार आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील महायुती सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना घेवून "मा.शरद पवार साहेबांच्या” नेतृत्वात “आक्रोश मोर्चाचे" आयोजन करण्यात आले आहे.