शिवसेना उरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


 
रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उरण तर्फे दरवर्षी बाझारपेठ गणपती चौकात गणेशोत्सव साजरा होता. दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम गणेशोत्सव काळात राबविले जातात यंदाही शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उरण यांच्या वतीने बुधवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेजवळ अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई व जयश्री फाउंडेशन यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये बी.पी चेक, शुगर चेक , वजन चेक, रक्तदाब तपासणी, शरीर द्रव्य निर्देशांक (BMI), हाड घनता तपासणी, तसेच सर्व रुग्णांना शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला.या शिबिरामध्ये १३०  नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराचा आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी, भाविक भक्तांनी श्री गणेशोत्सव मंडळाचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत.
 
 या या शिबिरास शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, माजी शहर संघटक प्रवीण मुकादम, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिवा म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते, सदर आरोग्य शिबिराच्या आयोजन शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील, सुशांत तांडेल, संजय मेश्राम, फतेह खान, रोनित पाटील, यश मढवी व कार्यकर्ते यांनी केले होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर