लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क रहावे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान
जयपूरमध्ये पार पडलेल्या ग्रँड फायनलमध्ये रनर-अपचा बहुमान; महाराष्ट्राचे केले प्रभावी प्रतिनिधित्व* लातूर, दि. २३(प्रतिनिधी) : जयपूर येथील झी स्टुडिओमध्ये दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया (FSIA) 2025’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत लातूरची कन्या शिवानी हिने उल्लेखनीय यश संपादन करत रनर-अप (द्वितीय क्रमांक) हा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर झाला आहे. या भव्य ग्रँड फायनलमध्ये देशभरातील विविध राज्यांतून निवड झालेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांमध्ये आपली वेगळी छाप पाडत शिवानीने महाराष्ट्र राज्याचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता आणि भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत दर्शन घडवत तिने परीक्षकांची विशेष दाद मिळवली. शिवानी ही VDGMC (विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), लातूर येथे एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून, वैद्यकीय शिक्षणासोबतच कला, संस्कृती व...