जीएसटी दरात मोठी कपात; व्यापार, उद्योग व ग्राहकांना दिलासा

 

"वस्तु व सेवा कर संरचना – 2025"

लातूर, (प्रतिनिधी) : दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीणच्या वतीने “वस्तु व सेवा कर संरचना – 2025” या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  भारतीय जनता पक्षाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष  मा. बसवराज पाटील होते व प्रा. प्रेरणा होनराव, प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमात केंद्र शासनाने नुकतीच केलेली महत्त्वपूर्ण घोषणा – CST (Central Sales Tax) दर १2 % वरून ५% कमी करण्यात आल्याचे सांगितले.

प्रा. होनराव यांनी सांगितले की, CST कपात ही केवळ कर कमी करण्यापुरती नसून देशातील व्यापारी, उद्योगपती आणि ग्राहक या सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचा करभार मोठ्या प्रमाणात कमी होईल, राज्याबाहेरील व्यापार वाढीस चालना मिळेल, तर उद्योगांना कच्चा माल स्वस्तात उपलब्ध झाल्याने उत्पादन खर्च घटेल. परिणामी ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होतील.

जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, “लातूर जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी व उद्योगपती यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. व्यापार वाढीस लागेल, रोजगारनिर्मिती होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल. भाजपा सरकार नेहमीच व्यापारी व शेतकरी हितासाठी प्रयत्नशील असते, हे या निर्णयातून स्पष्ट होते.”

CST दर १२% वरून ५% झाल्यामुळे व्यापारी-उद्योगांना दिलासा, ग्राहकांना स्वस्त दर आणि अर्थव्यवस्थेला गती अशी त्रिस्तरीय फायद्याची स्थिती निर्माण झाली असून हा निर्णय व्यापार सुलभतेसाठी ऐतिहासिक ठरला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर