गणेश नगरातील श्री गणेश मंडळात आरती व सत्कार कार्यक्रम संपन्न
लातूर : शहराच्या पूर्व भागातील गणेश नगर येथील श्री गणेश मंडळामध्ये भव्य आरतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या आरतीचा मान माजी पंचायत समिती सदस्या सौ. अदितीताई अजित पाटील कव्हेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गणपती बाप्पाच्या जयघोषात झालेल्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित श्री. चंद्रकांत वाघमारे यांचा सौ. अदितीताई अजित पाटील कव्हेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले तर मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे दिपमाला मस्के आणि संजयकुमार सूर्यवंशी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील कार्यकर्ते व मान्यवरांचा गौरव करण्याची परंपरा श्री गणेश मंडळाने यावर्षीही कायम ठेवली. धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मंडळाचे वतीने स्वागत व सत्काराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार सकट व सचिन सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला शिवाजी नवगिरे, कावेरीबाई सगट, निर्मलाताई कांबळे, पिंटू सूर्यवंशी, संगीताताई शिंदे आदींची उपस्थिती लाभली.