बालाजीराव जाधव यांना "धरती आबा बिरसा मुंडा" पुरस्कार जाहीर



  लातूर, दि. ९ (प्रतिनिधी) : नांदेड येथे दरवर्षी देण्यात येणारा धरती आबा बिरसा मुंडा विशेष योगदान पुरस्कार लातूर येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजीराव जाधव यांना जाहीर करण्यात आला असून दि.17 सप्टेंबर 2025 रोजी सांय 6वाजता, कुसुम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक रुपेश पाडमुख व रामेश्वरजी धुमाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मीमांसा फाऊंडेशन, मंथन क्रिएटीव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्याला अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदाचे हे 17 वे वर्ष आहे. लातूर येथील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत राहून 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण करणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजीराव जाधव यांना धरती आबा बिरसा मुंडा विशेष योगदान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात येणार असून सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यास
सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वरजी धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव पाटील, समाजसेवक बालाजी दुधबे,उपसंपादक ज्ञानेश्वर पवार, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुलकर्णी, सखाराम कुलकर्णी, रमेश तिवारी, प्रदेश सचिव दताजी मोहिते, सौ. सुनिता चौहाण, सौ. सुनीता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ. अरुणा पुरी, शिवहरी गाडेे यांच्यासह मुख्यसंयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर