खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना अमोल देडे यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा!


लातूर, दि.५ (प्रतिनिधी): लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री. डॉ. शिवाजी काळगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्तरांतील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री. अमोल देडे यांनी खासदार डॉ. शिवाजी काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. काळे यांच्या कार्याचा गौरव करत, लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला.

अमोल देडे यांनी सांगितले की, “डॉ. शिवाजी काळे हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिले आहेत. त्यांनी आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे लातूर जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होत आहे.”

डॉ. काळे यांनीही शुभेच्छा स्वीकारताना सर्वांचे आभार मानले आणि आगामी काळातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवत विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभेच्छुक उपस्थित होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील जनतेत उत्साहाचे वातावरण होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर