आमदार रोहित पवार यांचा उद्या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार
लातूर, दि. ०१ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व आमदार मा. रोहित दादा पवार हे उद्या गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहेत.
या दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील :
- सकाळी ०८ वा. अहमदपूर (माजी मंत्री मा. विनायकराव पाटील यांच्यासोबत)
- सकाळी ०९ वा. हाळी-हंडरगुळी, ता. उदगीर
- सकाळी १० वा. बेळसांगवी (तिरू नदी), ता. जळकोट
- सकाळी ११ वा. तिरूका, ता. जळकोट
- सकाळी ११.३० वा. नळगीर, ता. उदगीर
- दुपारी १२.३० वा. उदगीर येथे पत्रकार परिषद (माजी आमदार मा. सुधाकर भालेराव यांच्या निवासस्थानी)
- दुपारी ०२ वा. धनेगाव, ता. देवणी
- दुपारी ०२.३० वा. लिंबाळा, ता. निलंगा
- दुपारी ०३.३० वा. उजनी, ता. औसा
या दौऱ्यात ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणार असून, त्यांच्यासाठी आवश्यक त्या मदतीसंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे समजते.
या दौऱ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शेटे यांनी केले आहे.