लातूरमध्ये "हालगी नाद पद यात्रा आंदोलन"; ११ सप्टेंबरला भव्य आयोजन
लातूर, दि. १० (प्रतिनिधी) : साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी "हालगी नाद पद यात्रा आंदोलना"चे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे आयोजन साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, वर्ष २०२५ लातूर तसेच "समस्त मातंग समाज, समाजातील नेते, कार्यकर्ते, समस्त समाजबंधाव, भगिनी" यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
हे आंदोलन दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी, गुरुवार सकाळी ११.०० वाजता पार पडणार असून, या वेळी डॉ. अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा परिसर, लातूर येथून मेन रोडमार्गे मा.आयुक्त कार्यालय, महापालिका, लातूर येथे पदयात्रा आंदोलन काढले जाणार आहे.
आंदोलनाचे प्रमुख विषय :
- डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे – डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना "भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान" भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा.
- लातूर येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे – लातूर जिल्ह्यात डॉ. अण्णाभाऊ साठे यांची स्मृती जपण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याची मागणी.
- लातूर महानगरपालिकेसमोर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा – सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून लवकरात लवकर पुतळ्याची उभारणी करावी.
- लहुजी यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता द्यावी – लहुजींचा वारसा व कला परंपरेला केंद्र व राज्य शासनाकडून मान्यता मिळावी.
- समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध ठोस मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीकडून समाजातील सर्व बांधवांना, कार्यकर्त्यांना, महिलांना व युवकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: "आपण सगळे एकत्र आलो तरच शासनाला आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल," असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे आंदोलन लातूरमध्ये समाजातील विविध घटकांना एकत्र आणून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या स्मृतींचा सन्मान आणि समाजहिताच्या विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. तरी समस्त मातंग समाजातील कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.