अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कराड कुटुंबियांचे सांत्वन
लातूर, दि. १२ : मांजरा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केलेल्या वांगदरी येथील भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेऊन सांत्वन केले. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड यावेळी उपस्थित होते.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी कराड कुटुंबियांना धीर देत त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच इतर कोणत्याही युवकांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले.