“बेघर-भाडोत्री सभासदांचे हलगी आंदोलन"


      लातूर, दि. ,१९ (प्रतिनिधी): क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कामगार संघटना यांच्या वतीने बेघर-भाडोत्री महिलांसाठी हक्क मिळवून देण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गेल्या अनेक वर्षांपासून २५ ते ३० वर्षे भाडोत्री म्हणून राहत असलेल्या कुटुंबांना जमीन, घरकुल व हक्काचे छत मिळावे, या मागणीसाठी संघटनेतर्फे जोरदार पातळीवर संघर्ष छेडण्यात आला आहे. रामेश्वर व चिंचोलीराव वाडी येथील गायरान जमिनीसंदर्भात मागील अनेक वेळा तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

संघटनेच्या अध्यक्षा ज्योती लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले की, "३३ एकर गायरान जमीन असून ती बेघर-भाडोत्री महिलांसाठी वाटप करावी, हा आमचा ठाम आग्रह आहे. शासन व प्रशासनाकडून याबाबत ठोस निर्णय व्हावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल."

या आंदोलनात संस्थापक , कावेरी विभुते आदी महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान “हक्क द्या, छत द्या, आमचा अध्यक्षा उज्वला कांबळे, कमल रणदिवे, स्वाती कांबळे आवाज ऐका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

बेघर-भाडोत्री महिलांसाठी प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून गोरगरीब कुटुंबांना जगण्यास आवश्यक असलेली जमीन व घरकुल उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

अण्णाभाऊ साठे चौकापासून ते तहसील कार्यालयासमोर झालेल्या या हलगी आंदोलनात  महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार लातूर यांना देण्यात आले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर