निटूर येथे आज रक्तदान शिबीर व व्याख्यानाचे आयोजन


लातूर दि. ३ (प्रतिनिधी) – आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्थूलत्व व मधुमेह या आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (ADORE) या संस्थेमार्फत “स्थूलत्व व मधुमेह मुक्त विश्व” या अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात मोफत रक्त तपासणी शिबिर व जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानासाठी प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे मार्गदर्शन लाभणार असून, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नंदकुमार हाडगोकर आहेत.

आज गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ सकाळी ८ ते १० वा. व्यापारी गणेश मंडळ, निटूर (ता. निलंगा) येथे दुसरे शिबिर होणार आहे.


या शिबिरातील सुविधा, मोफत रक्त तपासणी, मधुमेह स्थूलत्व निदान, आहारशैली व जीवनशैली सुधारण्याबाबत मार्गदर्शन, रोगप्रतिबंधक उपायांवर व्याख्यान होणार आहे.
   तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी उपाशीपोटी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

जागतिक आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित म्हणाले, “मधुमेह हा एक जीवनशैलीशी निगडित आजार आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम व योग्य सवयी अंगीकारल्यास हा आजार टाळता किंवा नियंत्रणात आणता येतो. ADORE संस्थेचे हे अभियान केवळ आजार बरा करण्यासाठी नाही तर समाजाला आरोग्यसंपन्न करण्यासाठी आहे.”
     निटूर परिसरातील नागरिकांमध्ये या शिबिराबाबत उत्सुकता दिसून येत आहे. “मोफत तपासणीमुळे गोरगरीब लोकांनाही वेळेवर निदान होईल. तसेच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवणे सोपे होईल,” असे आवाहन संयोजक डॉ. नंदकुमार हाडगोकर यांनी सांगितले, “ADORE चे अभियान समाजाला मधुमेह व स्थूलत्वमुक्त करण्याचा ध्यास घेऊन राबवले जात आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी व्हावे आणि स्वतःसह कुटुंबाचे आरोग्य जपावे.” अधिक माहितीसाठी मो. ९६५७३५७५७ वर  संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर