पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण
लातूर, दि. २६ सप्टेंबर रोजी आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समिती तर्फे पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या १०९व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आज भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा कार्यालयात उपाध्यायांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा संयोजक अॅड. शितल पाटील, सह संयोजक किशनराव बडगिरे, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ संयोजक उदय देशपांडे, सह संयोजक संजयकुमार सूरवसे, सह संयोजक ब्रह्मानंद पोतदार आदींनी पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्यांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमात वक्त्यांनी पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानववादाचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याची त्यांची संकल्पना आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाशी निगडित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. उपाध्यायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.