देशमुख कुटुंबांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून सांत्वन
लातूर दि. ८. लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. रामचंद्र देशमुख यांचे काही दिवसापूर्वी नुकतेच दुःखद निधन झाले. त्याबद्दल सोमवारी सायंकाळीं गोंदेगाव येथील निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी सांत्वन पर भेट दिली. कुटुंबांचे सांत्वन केले
याप्रसंगी मांजरा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकआप्पा काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड प्रमोद जाधव, मारुतीचे चेअरमन शाम भोसले ,रवींद्र काळे, सचिन दाताळ, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, मांजराचे संचालक दयानंद बिडवे, गोंदेगावचे सरपंच पांडुरंग देशमुख भागवत देशमुख, राहुल देशमुख, विश्वनाथ देशमुख, सुनिल देशमुख, अमोल देडे, विश्वनाथ खैरे, अशोक सोनवणे, भैरवनाथ झाडके हणमंत जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.