इंद्रायणी निवासस्थानी मंत्री बाबासाहेब पाटील यांचा पत्रकार खंडेराव देढे व काकासाहेब गुटे यांच्या हस्ते सत्कार


    शिरूर ताजबंद, दि. १५ (प्रतिनिधी): शिरूर ताजबंद येथे इंद्रायणी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांचे पुष्पहार घालून मन:पूर्वक स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यास मकरंद सावे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार खंडेराव देढे यांनी मंत्री महोदयांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यांच्या सोबत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष काकासाहेब गुटे यांनीही मंत्री महोदयाचे स्वागत केले. दोघांनी मंत्री महोदयांचे सत्कार करून त्यांच्याशी विविध मागण्यांचे प्रश्नांवर चर्चा केली.

इंद्रायणी निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या. गावाच्या प्रगतीसाठी राज्य सरकारतर्फे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

मंत्री महोदयांनीही ग्रामस्थांना विश्वास देत सांगितले की, शहरी, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न शासनस्तरावर केले जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर