मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर


    लातूर, दि. ११ (प्रतिनिधी): साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समितीच्या वतीने “हलगी नाद पदयात्रा आंदोलन” लातूर येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पासून ते लातूर महानगरपालिका येथे उत्साहात पार पडले. समस्त मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन राबविण्यात आले. समाजाच्या हक्कांच्या व विकासाभिमुख विविध मागण्यांनासाठी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळाशेजारील जागा तात्काळ आरक्षित करण्यात यावी.

   क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पुतळा मिनी मार्केट येथे उभारण्यात यावे.

महानगरपालिकेतील सेवा बजावणाऱ्या व सेवानिवृत्त मातंग समाजातील पात्र कर्मचाऱ्यांना सेवा हक्क व सेवानिवृत्ती वेतन तात्काळ मिळावे.

    आंदोलनादरम्यान समाजबांधवांनी एकजूट दाखवली. शासन व प्रशासनाने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेत्यांनी दिला.

“हलगी नाद पदयात्रा आंदोलन”मुळे लातूर शहरात समाजातील ऐक्य, संघर्षशीलता आणि डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा दृढ संकल्प पुन्हा अधोरेखित झाला.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर