राज्यात लातूर पॅटर्न अव्वल, १२०३ विद्यार्थी मेडिकलला प्रवेशित
लातूर, दि. २१ : राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात 'लातूर पॅटर्न'ची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यंदाच्या नीट (NEET) परीक्षेत लातूर जिल्ह्यातील तब्बल १२०३ विद्यार्थ्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेड जिल्ह्याने ९३५ विद्यार्थ्यांसह दुसरा क्रमांक मिळवला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ९०३ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत.
राज्यातील मेडिकल प्रवेशामध्ये लातूर जिल्ह्याचा टक्केवारीनुसार सर्वाधिक वाटा असून, पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ची दणदणीत ताकद अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत यशाची नवी शिखरे गाठली आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय मेडिकल प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या (२०२५):
लातूर – १२०३
नांदेड – ९३५
छ. संभाजीनगर – ९०३
पुणे – ८०८
सोलापूर – ६७६
लातूर जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांची मेहनत या यशामागे महत्त्वाचे घटक ठरले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
राष्ट्रीय पातळीवरही लातूर जिल्ह्याने विशेष कामगिरी करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
👉 ‘लातूर पॅटर्न’चा हा विक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, वैद्यकीय क्षेत्रात लातूरच्या विद्यार्थ्यांचा वर्चस्व पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.