साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी
लातूर, दि. ९ ऑगस्ट : स्वप्नपूर्ती महिला बचत गट, संत गोरबा सोसायटी, नांदेड रोड, लातूर यांच्या वतीने दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती श्रीमती गंगुबाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सालूबाई सरवदे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना सौ. चंद्रकला श्रीपती शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी महिलांना आवाहन केले की, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातील अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश आपल्या जीवनात उतरवावा. आपणही आपल्या परिसरात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे.
या कार्यक्रमास बचत गटाच्या सदस्यांपैकी सौ. कलुबाई देडे, सौ. मनीषा देडे, सौ. भाग्यलक्ष्मी गव्हाणे, सौ. आरुणा सरवदे, सौ. विपाली सरवदे, सौ. उज्ज्वला शिंदे, सौ. कांताबाई चव्हाण, सचिव सौ. अनुराधा शिंदे तसेच सौ. बायखबाई काळे यांच्यासह परिसरातील महिला, मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गंगुबाई शिंदे यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन सौ. मनीषा देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. भाग्यलक्ष्मी गव्हाणे यांनी केले.