*शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित*
उरण, १३ ऑगस्ट – आरकेएफ विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण JNPA चेअरमन उन्मेश वाघ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. भविष्य निर्वाह निधीची देणी दोन दिवसांत अदा करणे, करारबद्ध कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीकरण, ₹६४ लाख थकबाकीची परतफेड, ६ वा व ७ वा वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि विद्यालयाचे व्यवस्थापन JNPA कडे ठेवणे अशा महत्त्वाच्या निर्णयांची बैठकित घोषणा झाली. मागण्या ३१ ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.