लातूर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

     लातूर, दि. 28 : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. उद्या, 29 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना उद्या, 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर