लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त मार्केट यार्डमध्ये मोफत वैधकीय तपासणी शिबीर संपन्न


*शिबारामध्ये ७०० पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी व औषधे वाटप*

लातूर: लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर, उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती लातूर व लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दगडोजीराव (दादा) सभागृह, मार्केट यार्ड लातूर येथे मोफत वैधकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन व विलासरावजी देशमुख साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती जगदीश बावणे, उद्घाटक व कार्यक्रमाचे समन्वयक प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्याण बरमदे, प्रमुख उपस्थिती लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूरचे चेअरमन अशोक (गट्टू शेठ) अग्रवाल, विशेष उपस्थिती संतोष सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी यांची होती.  

सदरील शिबीरमध्ये ७०० पेक्षा जास्त मार्केट यार्ड व परिसरातील गोरगरीब गरजूंनी याचा लाभ घेतला. यामध्ये शुगर,बीपी, आरोग्य तपासणी, आरोग्य सल्ला, औषधे मोफत देण्यात आले, तसेच रुग्णांसाठी नाष्टा व चहा ची व्यवस्था करण्यात आली होती. लातूरमधील नामांकित ह्रदयरोग, अस्थिरोग, मधुमेह, दमा व जनरल फिजिशियन यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरातील रुग्णांसाठी ५०% सवलतीच्या दरात सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, पॅथोलॉजी तपासणी दि. १४ ऑगस्ट २०२५ ते २४ ऑगस्ट २०२५ या काळात विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

शिबिराचे समन्वयक प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. कल्याणजी बरमदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सभापती जगदीश बावणे व लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूरचे चेअरमन अशोक (गट्टू शेठ) अग्रवाल यांच्या नियोजनातून सदरील शिबिर घेण्यात आले. शिबिरात डॉ. संजयकुमारजी शिवपूजे, डॉ. नानासाहेबजी  भोसले , डॉ. ओमप्रकाशजी  भोसले , डॉ. प्रदीपजी इंदलकर, डॉ. अनमोलजी  गवारे, डॉ. श्रीशैल जळकोटे,  डॉ. महेश शिंदे, डॉ. चांद पटेल, डॉ. मनोज कदम, डॉ. दिग्विजय शिंदे, डॉ. प्रणित बंडगर व विविध वैधयकीय सहाय्यक यांनी रुग्णांची तपासणी केली.

यावेळी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, सचिव अरविंद पाटील, सहसचिव सतीश भोसले, संचालक अड. लक्ष्मण पाटील, युवराज पाटील, अनिल पाटील, शिवाजी देशमुख,आनंद पाटील, बालासाहेब बिदादा, सुधीर गोजमगुंडे, बालाजी वाघमारे, शिवाजी कांबळे    तसेच बाजारसमिती मधील विविध आडत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, माला भुतडा, शशिकांत मोरलावार, गणेश हेडडा, किशोर भरडिया, राजेश अग्रवाल, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी सुशिल जोशी, संतोष बनभेरू, रवींद्र मदने, सुहास राजमाने, सिद्धेश्वर पवार व कर्मचारी उपस्थित होते, शिबिरासाठी इंडियन मेडिकल असो. बाजार समिती व बँकेच्या कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुशील जोशी यांनी केले व  बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर