लातूर जिल्हा बँकेच्या गौरवशाली परंपरेत आ. संभाजी पाटील निलंगेकरानी संभ्रम निर्माण करू नये


*शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते नेते राजेंद्र मोरे यांचा इशारा*
 
      लातूर, दि.२१: राष्ट्रीय पातळीवर असंख्य पुरस्कार प्राप्त करणारी  राज्यातील जिल्हा बँकात टॉप तीन मध्ये असलेली लातूर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून जिल्ह्यातील शेतकरी सभासदांत आमदार  संभाजी पाटलांनी बेताल वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला शेतकरी  संघटनेचे प्रवक्ते नेते राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.


*आमदार संभाजी पाटील यांच्या आरोपाला शेतकरी भीक घालणार नाही* 

लातूर जिल्ह्याची निर्मिती होऊन अवघे चार दशक झाले आहेत. लातूर जिल्हा निर्मितीनंतर लातूरचे नंदनवन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते  विलासराव देशमुख साहेब यांचे कार्य कोणालाही विसरता येणार नाही.जिल्ह्यात शिक्षण, सहकार उद्योग,कला, क्रीडा,सामाजिक न्याय, कृषी, आणि सहकार अशा विविध क्षेत्रात आपली वैचारिक दूरदृष्टी वापरून अचूक असे सूक्ष्म नियोजन करून झपाट्याने पुढें घेवुन विकास करण्यासाठी  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र सर्वश्रुत आहे. संपूर्ण जिल्ह्यात सामान्य माणसांना शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहकार क्षेत्राचे जाळे निर्माण केले  असून आज चौफेर प्रगती दिसून येत आहे. लातूरची संस्कृती ही विविध विचारधारा जोपासणारी असतानाही विकासाच्या मुद्द्यावर लातूरचे नेतृत्व एकत्रित असल्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला लातूर  जिल्ह्याला माहिती  आहे.लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट झाला असून आनंद सुख समृद्धी नांदत आहे. उद्योग क्षेत्रात भरीव मदत करताना शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून अनेक सहकारी कारखान्यांना आर्थिक मदत करताना शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा विक्रम याच बँकेच्या नावावर आहे. एकंदरीत बँकेचा कारभार हा अतिशय पारदर्शी असून हजारो शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा झाल्याची माहिती बँकेच्या लेखापरीक्षणातून आणि बँकेकडून ठेवलेल्या नोंदीवरून दिसून येतो. मात्र परवाच माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी बँकेच्या कारभारावर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करताना शेतकऱ्यात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे परंतु अशा आरोपाला इथला शेतकरी भीक घालणार नाही असे मत शेतकरी नेते राजेंद्र मोरे प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केला आहे.

*मानसिक संतुलन बिघडले*

 आ.संभाजीराव पाटलांना त्यांच्या पक्षात काडीची सुद्धा किंमत राहिली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याने त्यांनी तातडीने मानसोपचार तज्ञाची भेट घेऊन आपला इलाज करून घ्यावा अशी खोचक टीका श्री मोरे  यांनी करुन  आमदार संभाजी पाटील यांच्या आजोबाच्या नावाने असलेला कारखाना, बँक आणि संस्था मातीमोल झालेल्या आहेत त्याची डागडुजी करण्यासाठी आपला वेळ आणि वजन खर्ची करावे जेणेकरून या जिल्ह्याला स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर  शिवराजजी पाटील चाकूरकर अशा विचारवंत नेत्यांच्या परंपरेला तडा जाणार नाही. 

*जिल्हा बँकेच्या ठेवी व शाखेचा डोलारा हाच मोठा विश्वास*

लातूर जिल्हा बँकेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून  बँकेचा असलेला पारदर्शकता व बँकेच्या एकूण ठेवी आणि शाखेचा विस्तार प्रत्यक्ष पाहिला असता हा विश्वासाचं डोलारा आहे त्यामुळे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अनेक संस्था जिल्हाभरात प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आलेली आहे त्यामुळे संभाजी पाटलांनी सूर्यावर थुंकू नये अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाभरात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात  लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर