डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचा यूके दौरा – "दिक्षित डाएट व लाइफस्टाईल" विषयावर मार्गदर्शन

लातूर/लंडन दि.३० – प्रसिद्ध आहारतज्ज्ञ व "डिक्सिट डाएट अ‍ॅण्ड लाइफस्टाईल"चे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ५ ते १३ सप्टेंबर २०२५ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर येत असून या दरम्यान विविध शहरांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. "Maay Marathi UK" व "Maay Talk" यांच्या संयुक्त विद्यमाने हा दौरा होत आहे.

या व्याख्यानांमध्ये डॉ. दीक्षित "डिक्सिट डाएट व लाइफस्टाईल अ‍ॅप्रोच" यावर सखोल माहिती देणार असून, मधुमेहासह जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रतिबंध व उलटविण्यासंबंधी मार्गदर्शन करतील. तसेच आरोग्य परत मिळवणे, उर्जा वाढवणे व जीवन सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी आवश्यक उपाय सांगणार आहेत.

📍 कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

  • लंडन – ५ सप्टेंबर २०२५, सायं. ६.३० ते ८.३०
    स्थळ : नेहरू सेंटर, लंडन
    आयोजक : Maay Marathi UK & Nehru Centre

  • लेस्टर – ६ सप्टेंबर २०२५, सकाळी ११.३० ते दुपारी २
    स्थळ : Rushey Mead Academy Auditorium, Leicester
    आयोजक : Nirvana Events & EMMA

  • लीड्स – ६ सप्टेंबर २०२५, सायं. ५.३० ते ७.३०
    स्थळ : The Queens Hall, Leeds
    आयोजक : Leeds Marathi Mitra Mandal

  • हुल – ७ सप्टेंबर २०२५, सायं. ५ वा.
    स्थळ : Hindu Cultural Centre, Park Street, Hull
    आयोजक : Hindu Cultural Centre

  • ग्लासगो – १० सप्टेंबर २०२५, सायं. ७ ते ८.१५
    स्थळ : Mother Earth Hindu Temple, Glasgow
    आयोजक : नंदा सटपुते

  • हॅरो – ११ सप्टेंबर २०२५, सायं. ६ ते ८
    स्थळ : Community Centre (Hub), Harrow
    आयोजक : GIO & Sidhashram

  • मिल्टन कीन्स – १२ सप्टेंबर २०२५, सायं. ६.१५ ते ८
    स्थळ : Monkston Community Centre, Milton Keynes
    आयोजक : KalaSanskruit UK & OMPEG

  • लँगली – १३ सप्टेंबर २०२५, दुपारी १.३० ते ३
    स्थळ : Langley Academy, Langley Road, Langley
    आयोजक : Slough Mitra Mandal

  • रेडिंग – १३ सप्टेंबर २०२५, सायं. ६ ते ९
    स्थळ : Spencers Wood Village Hall, Reading
    आयोजक : Marathi Mandal Reading UK

🌿 या व्याख्यानांद्वारे यूकेमधील मराठी व भारतीय समुदायाला आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्व पटवून देत, डॉ. दीक्षित प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील. आरोग्यसंपन्न व रोगमुक्त जीवनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर