जी-२४ लातूर आयोजित साहित्यरत्न लोकनायक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जाहीर व्याख्यानाचे आयोजन

   लातूर, (दि. ३० ऑगस्ट) जी-२४ लातूर आयोजित साहित्यरत्न लोकनायक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, सायं. ५ वा. हॉटेल अंजली सभागृह, शिवाजी चौक, लातूर या
जाहीर व्याख्यानाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजातील वंचित, शोषित घटकांना आवाज देणाऱ्या अण्णाभाऊ साठ्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे.

या व्याख्यानाचा विषय "जनसुरक्षा कायदा लोकशाहीसाठी धोकाः" असा असून, प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. सामनाथ रोडे (इतिहास तज्ञ तसेच थोर चिंतक) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी-२४ प्रगती अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष राजकुमार होळीकर राहणार असून, समाजातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी पांडुरंग देडे (सचिव), अड. सोपानराव वाघमारे (कोषाध्यक्ष), अफजल कुरेशी (कार्याध्यक्ष), शिरीष दिवेकर, बाळासाहेब सावळे, वसंत काकडे, बी. ए. पाटील यांच्यासह विविध मान्यवर समिती सदस्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन समितीच्यावतीने करण्यात येईल. विशेष म्हणजे, अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये होणारे हे व्याख्यान समाजजागृतीसाठी महत्वाचे ठरणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर