पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे चंद्रकांत वाघमारे यांनी मानले जाहीर आभार


लातूर, दि. १४ ऑगस्ट २०२५ :
लातूर शहरातील पूर्व भागातील रहिवासी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी पदाधिकारी श्री. चंद्रकांत नरसिंगराव वाघमारे यांना महाराष्ट्र शासनाच्या सन २०२३-२४ या वर्षीच्या ‘अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजकारण व सामाजिक कार्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शासनाने हा पुरस्कार जाहीर केला.

हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात संपन्न झाला. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे लातूर दौऱ्यात आले असता चंद्रकांत वाघमारे यांनी त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले. 
      या वेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. बस्वराजजी पाटील, माजी पालकमंत्री मा. संभाजीभैया पाटील निलंगेकर, भाजपा शहराध्यक्ष अजीतसिंह पाटील, तसेच भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीर्घकाळापासून समाजहितासाठी कार्यरत असलेल्या वाघमारे यांनी गरीब, वंचित, शेतकरी व कामगार वर्गासाठी सातत्याने कार्य केले आहे. समाजाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी कायम सक्रिय भूमिका निभावली. सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय ठरले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नसून तो माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवूनच मी समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखीनच वाढली आहे.”

त्यांनी पुढे बोलताना पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे तसेच शासनाचे विशेष चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. त्याचबरोबर माजी पालकमंत्री मा. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर, भाजपा ग्रामीण
जिल्हाध्यक्ष श्री. बस्वराजजी पाटील, भाजपा शहराध्यक्ष अजीतसिंह पाटील कव्हेकर आदी मान्यवरांचे सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाघमारे यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की, समाजातील वंचित घटकांसाठी झटणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.

समाजभूषण पुरस्काराने गौरविले गेलेले श्री. चंद्रकांत वाघमारे हे लातूर जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या या सन्मानामुळे लातूर जिल्ह्याचा मान वाढला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर