डॉ. दीक्षित लाईफस्टाइल अभियानातर्फे मोफत ऑनलाईन योगा क्लासेस ५ ऑगस्टपासून

       पुणे, दि. २ (प्रतिनीधी) : डॉ. दीक्षित लाईफस्टाइल अभियानातील सर्व सदस्यांसाठी पुन्हा एकदा विना शुल्क ऑनलाईन योग वर्ग सुरू करण्यात येत असल्याची माहिती समन्वयक शिवशंकर स्वामी यांनी दिली. ५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत हे योगवर्ग आयोजित करण्यात आले असून, प्रत्येक रविवारी सुट्टी असेल. या वर्गांचा समारोप ३० ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. दीक्षित सर यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

या वर्गांमध्ये स्ट्रेचिंग, विविध प्रकारची योगासने, प्राणायामाचे प्रकार, ध्यान आणि प्रार्थना यांचा समावेश असून, नियमित सरावामुळे वजन कमी करणे, शुगर नियंत्रणात ठेवणे आणि शरीर निरोगी राखणे शक्य होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

     संपूर्ण कार्यक्रम झूम अ‍ॅपवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ४ ऑगस्ट ३०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता झूम लिंक पाठवण्यात येईल. दररोज वापरण्यासाठी ही एकच लिंक असणार आहे. मात्र झूम लिंकची क्षमता केवळ १०० व्यक्तींपर्यंत असल्याने सहभागासाठी दररोज पाच मिनिटे आधी लॉगिन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘जो प्रथम येईल त्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर सहभाग निश्चित केला जाणार आहे.

कार्यक्रमातील शिस्त आणि नियम यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला असून, सहभागीदरम्यान संवाद आणि एकाग्रता राखण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत:
      ग्रुपवर इतर कोणतेही मेसेज अथवा पोस्ट टाकू नये., योग सत्रादरम्यान सर्वांनी आपले व्हिडीओ चालू ठेवावे., आपला माईक बंद ठेवावा., झूम लिंक वेळेवर जॉईन करावी.
     या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी समन्वयक श्री. शिवशंकर स्वामी (मो. 94222 10371) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार होईल आणि सहभागी सदस्यांना मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर