राज्यस्तरीय ज्युनिअर ज्युदो स्पर्धा २२ ते २४ ऑगस्टदरम्यान लातूर येथे आयोजन


    लातूर, दि. २२ : लातूर शहर क्रीडा संस्कृतीसाठी नेहमीच ओळखले जाते. या परंपरेला पुढे नेत महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन व लातूर ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वी सब राज्यस्तरीय ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ तसेच राष्ट्रीय निवड स्पर्धा यांचे भव्य आयोजन लातूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धा २२ ते २४ ऑगस्ट २०२५ गिरवलकर मंगल कार्यालय, बार्शी रोड लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो खेळाडू सहभाग नोंदवत असून, त्यांची तयारी पूर्ण झाली आहे. विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे राज्य स्तरीय खेळाडू व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
   या वेळी आयोजक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, "लातूर जिल्ह्याला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा देण्यात येणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वतःची छाप पाडण्याची संधी मिळेल."

स्पर्धेसाठी पुणीत बळन ग्रुप यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मुले व मुलींच्या विविध वजन गटातील सामने रंगणार आहेत. कठीण परिश्रम, कौशल्य आणि शिस्त यांची सांगड घालणाऱ्या या खेळामुळे तरुणाईमध्ये आत्मविश्वास व लढाऊ वृत्ती विकसित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व भोजनाची योग्य सोय करण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांना थरारक सामने प्रत्यक्ष पाहता यावेत यासाठीही उत्तम व्यवस्थापन केले आहे.

लातूरकरांना राष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धांचा आनंद घेण्याची संधी लाभत असून, खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे, असे आवाहन संयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर