लक्ष्मी अर्बन बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साजरी
लातूर (दि. २ ऑगस्ट २०२५) : लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., लातूरची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अग्रसेन भवन येथे उत्साहात पार पडली. सभेपूर्वी सहकार शिक्षण सत्र घेण्यात आले.
सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी बँकेचा अहवाल सादर करत ८% लाभांश जाहीर केला. बँकेचे बांधकाम, डिजिटल सेवा, व युपीआय, आयएमपीएस, मोबाईल अॅपद्वारे होणारे रोजचे १६००० व्यवहार यांची माहिती दिली. बँकेला २०२४ चा राष्ट्रीय बेस्ट डिजिटल पेमेंट बँक पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमात शाखा सल्लागार, उत्कृष्ट ग्राहक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मोबाईल स्टॅंडीचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमात संचालक मंडळ, व्यवस्थापन समिती सदस्य, शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हा. चेअरमन सतिष भोसले यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन सौ. रेणुका नागुरे व सुशील जोशी यांनी केले.